---Advertisement---

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणेत २९३ जनावरांना लसीकरण;भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचा उपक्रम

On: September 18, 2022 10:34 PM
Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१८ : पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ दिल्ली यांच्यामार्फत लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात आली.या उपक्रमात २९३ जनावरांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश माने यांनी दिली.राज्यामध्ये सध्या जनावरांध्ये झपाट्याने हा रोग पसरू लागला आहे.या पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्त जाती जमाती विकास महामंडळाचे चेअरमन दादा विदाते,राष्ट्रीय अध्यक्ष बिभीषण जाधव,खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य
महास्वामी यांच्या सूचनेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन मशाक नदाफ,पप्पू शिंदे,यासीन मुजावर,अण्णासाहेब गायकवाड,अंबादास होटकर,पुंडलिक चौधरी,राजेंद्र घोडके,रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते हस्ते करण्यात आले.पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाड्या वस्त्यावर जाऊन हे लसीकरण करण्यात आले.अनोख्या पद्धतीने त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्याचे माने यांनी यावेळी सांगितले.यासाठी गटविकास अधिकारी
सचिन खुडे,पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बपरांडकर ,डॉ.अक्षय पागदुणे,डॉ.दिपक नडगिरे ,संकेत कुलकर्णी,धनश्री कुलकर्णी,नितीश राठोड ,मुस्तफा बागवान ,प्रथम दुपारगुडे यांचे सहकार्य लाभले.या शिबिराला गोकुळ शुगरचे
मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी बसवराज स्वामी ,गोविंद मोरे, महबूब नदाफ ,श्रीमंत राजेगावकर, धनराज व्हट्टे,तेजसकुमार माने, शिलार नदाफ, शार्दुल रसनभरे,महेश भरडे, हरूण नदाफ साहेब ,अक्षय मोरे, यशवंत मोरे ,लक्ष्मण चव्हाण, आप्पा निंबाळकर, योगेश मोरे,अजिंक्य सालपे, लाला साळुंखे शिलार चौधरी ,चंदू गरडे, राम गरडे, गणपत होटकर, मोदीन नदाफ ,लक्ष्मण शिंदे ,माळाप्पा घोडके ,तानाजी पिटाळकर, सिद्धारूढ जोजन, गैबीपीर नदाफ ,सुधाकर कोळी,निजप्पा गायकवाड, वीरभद्र सुतार,मल्लू स्वामी ,मल्लू व्हनपालके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!