---Advertisement---

इंडियन प्रेस क्लबचे पदाधिकारी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी स्वामीनाथ हरवाळकर तर सोलापूर शहराध्यक्षपदी जगन्नाथ हुक्केरी; पाच तालुक्यातील अध्यक्षांची निवड जाहीर

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२५ : इंडियन प्रेस क्लब या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी स्वामीनाथ हरवाळकर व सोलापूर शहराध्यक्षपदी जगन्नाथ हुक्केरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पदाधिकारी ही निवडण्यात आले. हरवाळकर यांना राज्याध्यक्ष शहाजान अत्तार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आले. अध्यक्षस्थानी लिंगायत धर्मगुरू पूज्य बसवलिंग महास्वामीजी होते.

 

यावेळी पदाधिकाऱ्यांचा विविध सामाजिक
संघटना आणि प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तीकडून सत्कार करण्यात आला.यावेळी सुधीर माळशेट्टी, राष्ट्रवादीचे स्वामीनाथ पोतदार, ज्येष्ठ नेते विलास गव्हाणे, अपंग संघटनेचे बाळू शिंदे आदींची उपस्थिती होती.

हरवाळकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तालुका अध्यक्ष यांची निवड जाहीर केली. सोलापूर शहर जगन्नाथ हुक्केरी,दक्षिण सोलापूर इरण्णा गचीनगोटे, उत्तर सोलापूर पिंटू विभुते, मंगळवेढा विलास माशाळ, अक्कलकोट तालुका योगेश कबाडे, शहर दयानंद दणूरे याप्रमाणे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या अध्यक्षांचे निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार बाबा निंबाळकर म्हणाले, पत्रकारांची एकजूट भ्रष्टाचाऱ्यांचे किल्ले उध्वस्त करू शकतात. यावेळी जिल्हा व तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते. आगामी काळात पत्रकारांचे निवासस्थान आणि मोफत आरोग्यसेवा या प्रश्नासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे हरवाळकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय अध्यक्ष विवेक म्हमाणे-पाटील, कार्याध्यक्ष हाजी अब्दुल शेख उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, सरचिटणीस विकास कुलकर्णी खजिनदार जावेद मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात संघटना मजबूत करण्याचे काम सुरू आहे, असे अत्तार यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!