ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयहिंद शुगरची गाळप क्षमता वाढवली : माने देशमुख,यंदा १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उसाचे लागण झाल्याने आता बहुसंख्य शेतकरी बांधवांना यंदा उस वेळेवर जाईल की नाही यांची चिंता सध्या सतावत आहे.मात्र जयहिंद शूगरचे कारखाना व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीआश्वासक पाऊल उचलले आहे.कारखान्याची गाळप क्षमता वाढवली असून जयहिंद शूगरने साखर आयुक्तांकडून वाढीव गाळप क्षमतेबाबत रीतसर परवाना घेऊन तसेच तालुक्यातील शेतकर्यांची गरज ओळखून आता दररोज १२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली.

 

जयहिंद शूगरला उस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असतानाही आजपर्यंत कारखान्याची गाळप क्षमता मात्र दररोज पाच हजार मेट्रीक टन इतकाच उस गाळप होत होता.यामुळे गाळप हंगाम संपताना ही अनेक शेतकऱ्यांचे ऊस शेतात शिल्लक राहत असे.म्हणून जयहिंद शूगरने शेतकऱ्यांची गरज ओळखून यंदा वाढीव गाळप क्षमतेने कारखाना हंगाम सुरु होणार आहे.यंदा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असताना ही ऊसाबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे जयहिंद शुगर कडून उस उत्पादकांना आवाहन करण्यात आले आहे.

यंदा दररोज १२ हजार मेट्रीक टन प्रतिदिन गाळप क्षमता करून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्यात येणार आहे. जयहिंद परिवाराच्या वतीने घेतलेल्या या शेतकरी हिताच्या निर्णयाचे उस उत्पादक शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे.यासाठी जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख,मुख्य व्यवस्थापक बब्रुवान माने-देशमुख, व्हाईस चेअरमन विक्रम पाटील व कारखाना व्यवस्थापक मंडळांनी अथक परिश्रम घेताना दिसून येत आहेत.

१५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

आमच्या कारखान्याप्रती शेतकऱ्यांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे.सोलापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील देखील ऊसाचा पुरवठा आम्हाला होतो.मागील वर्षाचा अतिरीक्त ऊसाचा प्रश्न फार मोठा होता.म्हणून कारखान्याच्या गाळपाची क्षमता वाढवली आहे.यावर्षी १५ लाख टन ऊसाच्या गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी अतिरिक्त ऊसाची चिंता करू नये – गणेश माने देशमुख, चेअरमन, जयहिंद शुगर-आचेगाव

उस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न

कारखाना संकटात असतानाही नेहमीच जयहिंद शूगरकडून सामान्य शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवून आज पर्यंत उस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.जयहिंद शुगरने सुरु केलेल्या इथेनॉल प्रकल्प,वीजनिर्मिती व साखर उत्पादनाच्या जोरावर यंदा टोळी अॅडवान्स,कामगार पगार,शेतकऱ्यांचे संपूर्ण उस बिल अदा केले आहेत.नवीन हंगामासाठी ऊस तोडणी यंत्रणा सज्ज आहे.मोठी वाहने,छोटी वाहने व हार्वेस्टर ची विक्रमी संख्या या द्वारे ऊस गाळपाचा उच्चांक साध्य होईल – बब्रुवान माने देशमुख,तज्ञ मार्गदर्शक, जयहिंद शुगर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!