अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान शिबीरात २ हजार ५१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.तसेच आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.बुधवारी,मोरे प्रतिष्ठानच्यावतीने एस.व्ही.सी.एस वीरतपस्वी हायस्कुल येथे आयोजित महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाट्न काशिपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरेयांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख होते.तर व्यासपीठावर सहायक पोलिस आयुक्त राजन माने,माजी नगरसेवक किरण देशमुख,प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे,माजी नगरसेवक शिवानंद पाटील,विनोद मोरे,दिलीप सिद्धे,तुकाराम बिराजदार, शांतय्या स्वामी,माजी नगरसेवक संजय कोळी,डॉ. सुहास माने व डॉ. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरु असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधारस्तंभ प्रमोद मोरे यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जलसंधारणाच्या कामांसह समाजाच्या विकासासाठी प्रतिष्ठानकडून नेहमीच उपक्रम राबविले जातात.ही बाब कौतुकास्पद असल्याचे काशी जगद्गुरु व आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
या शिबिरात २ हजार ५१५ जणांची मोफत तपासणी व औषधोपचार,६०० जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप,७०० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तर सर्जरीसाठी १२८, मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी २३५ जण पात्र ठरले असून त्यांची पुढील व्यवस्था प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येणार आहे. हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी सिव्हील हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार मोरे प्रतिष्ठानचे सचिव संजय टोणपे यांनी केले.