अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरातील सुभाष गल्ली येथील रिद्धी सिद्धी गणेश समाजसेवी संस्थेच्यावतीने जागृत रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ शहरातील भाविक भक्तांनी घेतला.प्रारंभी पहाटे सहा वाजता श्रींच्या मूर्तीस महाभिषेक करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. सकाळी दहा वाजता सत्संग महिला भजनी मंडळाचे भजन ,दुपारी बारा वाजता पाळणा व गुलाल कार्यक्रम तर दुपारी बारा ते चार या वेळेत महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी संस्थेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.यावर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ३८ जणांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात योगदान दिले.रिद्धी सिद्धी गणेश मंदिर व जय हिंद मित्र मंडळाच्यावतीने दिवसभर या कार्यक्रमात सहभाग घेत भाविकांची व्यवस्था केली.आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट विरक्त मठाचे म.नि.प्र बसवलिंग महास्वामी,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे
भोसले,माजी नगरसेवक महेश हिंडोळे,बसलिंगप्पा खेडगी,अशपाक बळोरगी, आनंद तानवडे,मल्लिकार्जुन पाटील आदींनी उपस्थिती लावत दर्शन घेतले.
यावेळी अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, सचिव दयानंद बिडवे,दत्तकुमार साखरे, राजेंद्र भुजंगे,दयानंद रोडगे, प्रीतिश किलजे,अप्पू पराणे, प्रकाश थंब, राजशेखर भरडे,राजशेखर कलबुर्गी,दत्ता कटारे,राजेश थंब,मलम्मा पसारे,सुवर्णा साखरे, चन्ना स्वामी,गुरू पोतदार आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.