ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील ७ खासदार ठरले ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ पुरस्काराच्या मानकरी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राने या पुरस्कारासाठी बाजी मारली असून, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह राज्याचे 7 खासदार पुरस्काराच्या मानकरी ठरले आहेत. प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेने प्रत्येक वर्षी संसदेत उत्कृष्ट, सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. या निवडीसाठी प्रश्न विचारणे, वादविवादात सहभाग, कायदेविषयक योगदान आणि समित्यांमध्ये केलेल्या कामांचा मूल्यांकन आधार ठरला. निवडीसाठी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदारांची नावे:

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

श्रीरंग बारणे (शिवसेना – शिंदे गट)

अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट)

नरेश म्हस्के (शिवसेना – शिंदे गट)

स्मिता वाघ (भारतीय जनता पक्ष)

मेधा कुलकर्णी (भारतीय जनता पक्ष)

वर्षा गायकवाड (काँग्रेस)

सुप्रिया सुळे यांचा गौरव

सुप्रिया सुळे या 16वी आणि 17वी लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक असून यंदाही त्यांचे संसदीय योगदान लक्षणीय ठरले आहे. त्यांच्या सोबतच श्रीरंग बारणे, भर्तृहरि महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही हा विशेष संसदरत्न सन्मान मिळाला आहे.

यांचाही होणार सन्मान

यावर्षी 4 खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसदरत्न सन्मान देखील देण्यात आला आहे. यामध्ये भर्तृहरि महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन, आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. हे चार खासदार 16व्या आणि 17व्या लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे ठरले असून, त्यांच्या कार्यकाळातही ते तितक्याच सक्रियतेने कार्यरत आहेत. प्रवीण पटेल (भाजप), रवि किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), विद्युत बरण महतो (भाजप), पी. पी. चौधरी (भाजप), मदन राठौर (भाजप), सी. एन. अन्नादुरई (द्रविड मुनेत्र कळघम) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!