---Advertisement---

बालकांच्या संरक्षणासाठी विभागांनी समन्वय ठेवा : जिल्हाधिकारी शंभरकर

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि. १४  :- कोविड संसर्गामुळे पालक गमावलेली बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा गुन्हेगारी कारवायांत ओढली जाऊ नयेत याची दक्षता राज्य शासनातर्फे घेतली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये सोलापूर जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयात झाली. त्या बैठकीत श्री. शंभरकर यांनी सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. शशिकांत मोकाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महिला व बालविकास अधिकारी विजय खोमणे, अनुजा कुलकर्णी, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली मुले आहेत का, असल्यास कोणत्या तालुक्यात आहेत याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश श्री. शंभरकर यांनी दिले. याबाबत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी अनाथ बालके असल्यास त्याबाबतची माहिती टास्क फोर्सला सादर करावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

जिल्ह्यातील बालग्रहातील सर्व कर्मचारी यांचे लसीकरण करावे, बालकांची विशेष काळजी घ्यावी, निरीक्षणग्रहांना आवश्यक असणारा निधी वेळेत उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

*बालकांच्या समस्यांबाबत संपर्क क्रमांक* चाईल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१०, अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष बालकल्याण समिती ९४२३३३०४०१, विजय खोमणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ८६०५४५३७९३, आनंद ढेपे ९८८१४९०२२६, दीपक धायगुडे ७३८७२६७९२२, जयाप्रदा शरणार्थी ७९७२५५०४२३, शोभा शेंडगे ९६८९९५८६४५
000000

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!