नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारत सरकारची जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या डोमिनिकातील तुरुंगात कैद आहे.
भारताने एका खासगी विमानाद्वारे डोमिनिका सरकारला चोक्सीच्या हस्तांतरणाची कागदपत्रे पाठवली आहेत. दरम्यान, चोक्सीचे भारताकडे हस्तांतरण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मेहुल चोक्सी भारतातून फरार झाल्यानंतर २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता.
६२ वर्षीय मेहुल चोक्सी डोमिनिकामधून क्यूबामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, यादरम्यान सीआयडीने त्याला ताब्यात घेतले. सूत्रांनी सांगितल्यानुसार, तो अँटीगुआ आणि बारबुडामधून बोटीद्वारे डोमिनिकामध्ये दाखल झाला होता.