---Advertisement---

कोण कोणाला भेटलं तरी २०२४ला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार – देवेंद्र फडणवीस

Follow Us:
---Advertisement---

नागपूर : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दरवाज्याआड चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. एवढंच नाही. तर या भेटींनतर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी दरम्यान कोणत्या विषयांवर खलबत झाले असतील या संदर्भात अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, कोणी कितीही स्ट्रॅटजी तयार केली तरी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकी नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, यात शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!