ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अनिल देशमुख यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; चार कोटी वीस लाखांची संपत्ती जप्त

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. शंभर करोड रुपये वसुली प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

अनिल देशमुखांवर मनी लाँडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत १०० कोटी रुपये खंडणी गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये वरळी इथला देशमुख यांच्या घराचा आणि उरण इथल्या जमिनीचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!