अक्कलकोटमध्ये रब्बी हंगाम पिक स्पर्धेचे बक्षीस वितरण, सांगवीच्या संजयकुमार भोसलेंनी घेतले हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन
अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुका कृषी विभागाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षा करिता रब्बी हंगामात पिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सांगवी (बु) येथील प्रगतशील शेतकरी संजयकुमार भोसले यांनी हरभरा पिकामध्ये हेक्टरी ३४ क्विंटल ८० किलो एवढे विक्रमी उत्पादन घेऊन सर्वसाधरण गटात अक्कलकोट तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण उपविभागीय कृषी अधिकारी कवडे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या हस्ते आज तालुका कृषी कार्यालयात करण्यात आला. तालुक्यातील विविध गावातील शेतकरी ही या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत ते या प्रमाणे.
★ ज्वारी- संजय नरसिंग धायगोडे, बादोला (बु), धुळप्पा बाबुराव मुळजे, गोगाव, सुशांत शांतप्पा किवडे, घोळसगाव
★ हरभरा – संजयकुमार नागनाथ भोसले, सांगवी (बु), शशांक गिरीष किणीकर, किणी, मलेशप्पा गुरप्पा गोरे, अक्कलकोट अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.
आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा. सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन काढून पुरस्काराचे मानकरी व्हावे,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी केले आहे.