---Advertisement---

शिवयोग धाम येथील गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – गुरुपौर्णिमेनिमित्त शेळगी येथील शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोव्हीड महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे.  श्री शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने शिवयोग धाम सेवा समिती शेळगीच्यावतीने गुरुपौर्णिमा व डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो.तसेच समाजाच्या कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी धार्मिक कार्यक्रम, पूजा, महाप्रसाद आदींचे आयोजन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात केले जाते.

Watch Our Latest Video

परंतु कोव्हीड महामारीमुळे खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामींचा जन्मदिवस व गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांनी घरीच गुरुस्मरण करावे. प्रतिवर्षी साजरा होणारा उत्सव यंदा होणार नसल्याची नोंद भक्तांनी घ्यावी असे आवाहन शिवयोग धाम सेवा समितीने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!