---Advertisement---

पसंतीच्या क्रमांकासाठी डीडी पाठविण्याचे आवाहन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर  : जिल्ह्यात चारचाकी वाहनाकरिताची MH-13-DU ही मालिका सुरू होणार असून पसंतीच्या आणि आकर्षक क्रमांकासाठी राष्ट्रीयकृत बँकेचा मागणी धनाकर्ष (डीडी) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे.

ग्राहकांनी डेप्युटी आरटीओ, सोलापूर यांच्या नावे डीडी काढून सीटीएस (Cheque Truncation System) आणि आधारकार्ड परिवहन कार्यालयातील लिपीक एस.एच. हरवाळकर यांच्याकडे 4 ऑगस्ट 2021 च्या दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करावेत. एकाच आकर्षक क्रमांकासाठी जास्त मागणी अर्ज आले तर त्याचा लिलाव करून क्रमांक देण्यात येणार असल्याचे श्री. डोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!