ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुत्रा चावल्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्रावर इंजेक्‍शन मिळावे : गुरुशांत धुत्तरगांवकर यांची मागणी

सोलापूर : – सोलापूर शहरातील नागरिकांना कुत्रा चावल्यानंतर अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी डफरीन चौक येथील महानगरपालिकेच्या दवाखान्यात जावे लागते. शहराच्या कानाकोपर्‍यातून डफरीन चौकात येणे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरते. शिवाय एकाच ठिकाणी गर्दी होऊन नागरिकांचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अँटी रेबीज इंजेक्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यास नागरिकांना कमी अंतरात सोय उपलब्ध होईल, येण्या-जाण्याचा खर्च वाचेल व गर्दीमुळे ताटकळत थांबावे लागणार नाही असे धुत्तरगांवकर यांनी सांगितले. आयुक्त पी. शिवशंकर व उपायुक्त धनराज पांडे यांनी सकारात्मकता दाखविली असून तसे आदेश देऊ असा शब्द दिला.

विस्कळीत पाणीपुरवठा
हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत असून तब्बल आठवड्यानंतर काही भागात पाणीपुरवठा सुरू आहे, तोही वारंवार बंद पडतोय. याविषयी आयुक्तांसमोर नाराजी व्यक्त करत गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी लवकर उपाययोजना करण्याची विनंती केली. प्रभागाच्या आसपास MIDC असल्याने केमिकल मिश्रीत पाणी जमीनीत मुरलेले आहे. त्यामुळे बोअरवेल मधील पाणी पिण्यायोग्य नाही. एकाचवेळी सगळीकडे टँकर पुरविणे शक्य होत नाही. मागील दोन दिवसांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांच्या घरात घोटभर सुध्दा पाणी शिल्लक नसल्याने सहनशीलतेचा अंत होतोय, ते संताप व्यक्त करत आहेत याची कल्पना आयुक्तांना दिली. आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता मठपती यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!