अक्कलकोट, दि.२५ : पुरग्रस्त बांधवांचा दसरा “हसरा” व्हावा म्हणून मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठानकडून अन्नधान्य वाटप वाटप करण्यात आले.
आठ दहा दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. यात बोरी नदीलगतच्या अनेक गावांमध्ये घराघरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातच अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे उभे पिके पुरस्थितीमुळे जमिनदोस्त झाली होती.यामुळे मायबाप शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले.म्हणून मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने सदस्यांच्या मदतीच्या माध्यमातून रामपूर (बोरी उमरगे) तसेच आंदेवाडी येथील पुरग्रस्त बांधवांचे दसरा सण ” हसरा” व्हावा या उद्देशाने जिवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.एकूण १०५ कुटुंबांना २ किलो गहू पीठ, २ किलो तांदूळ, पाऊणकिलो दाळ, एक किलो तेल अशा जिवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून वाटप करण्यात आले. यावेळी दोन्ही गावातील सरपंचांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.अन्नधान्य वाटप यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेतील सर्व सदस्यांनी कष्ट घेतले.