ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सध्याचे मुख्यमंत्री हे पार्ट टाईम मुख्यमंत्री, हिंमत असेल तर निवडणुका घ्या ; भाजप सरचिटणीस सीटी रवी यांचे आव्हान

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा, असे विधान भाजप सरचिटणीस सीटी रवी यांनी केली आहे. मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा भंग करून राज्यात निवडणुका घ्या, राज्यातील जनता निवडणुकीसाठी तयार आहे. असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी यावेळी केले आहे.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून दिले. भाजपला सत्तेत बसवण्याचा कौल जनतेने दिला होता. तरीही त्यावेळी भाजपसोबत युती असणाऱ्या शिवसेनेने जनतेला दगा दिला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापित केले. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही असेही सीटी रवी पुढे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. रोज वर्तमानपत्रात अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. हिंदूंना रोज अपमानित व्हावं लागत आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हिंदूंना नावं ठेवत आहे. रशीद अल्वीही हिंदूंवर टीका करत आहे. त्यांच्या सारखी शिवसेना आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार भ्रष्टाचार्यांचा अड्डा बनला आहे. हे सरकार महाविकास आघाडी नाही तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे. जो पक्ष हिंदू रक्षण करण्यासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी झाला आहे. एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटुंबाची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच काम होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!