---Advertisement---

एकशे सहा जणांच्या रक्तदानाने शिवसेनाप्रमुखांना वाहिली शहर शिवसेनेने आदरांजली

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना सोलापूर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विरोधी पक्ष नेता अमोल शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या शिबिराचे उद़्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, विजय पुकाळे, उपशहरप्रमुख रविकांत कांबळे, सचिन गंधुरे, देविदास कोळी, सिद्धाराम खजुरगी, केदार बरगले, सुनील अरळीकट्टी, आनंद मुसळे, देवा विटकर, अनिल जमादार, नरेंद्र क्षीरसागर, उमेश जेटगी, धुळप्पा आळंद, ॲड. योगेश कुरे, तुषार आवताडे, बालाजी चौगुले, सोमनाथ शिंदे, जयराम सुंचू, अमर बोडा, विश्वनाथ अलकुंटे, राहुल गंधुरे, शिवा ढोकळे, गणेश गोब्बूरे, ॲड.जावेद नगारे, रामचंद्र वाघमारे, दिपक पाटील, दिगंबर विटकर, राजू येमुल, किरण क्षीरसागर, खंडू सलगरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात कल्पना खरवाळे, सुवर्णा अलदी व शुभांगी धुत्तरगांवकर या तीन महिला रक्तदात्यांनीही रक्तदान करून सहभाग नोंदविला.

सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी
गजानन केंगनाळकर, मालिकार्जुन सातलगाव, सागर शिंदे, श्रीकांत चव्हाण, संजय यंगल, बसवराज जमखंडी, गणेश निरंजन, सुभाष होळीकट्टी, प्रभाकर होळीकट्टी, दत्ता सनके, तुकाराम चाबुकस्वार, किरण सिदमल, चंद्रकांत धुत्तरगांवकर, लक्ष्मीकांत कल्लूर, ओम धुत्तरगावकर, श्रीधर यंगल, संतोष दोडमनी व प्रशांत हिटनळ्ळी आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!