---Advertisement---

जयहिंद शुगरकडून ३१ ऑक्टोबरपर्यंतची ऊसबिले अदा : माने देशमुख, पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन २१०० रू जमा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१८ : आचेगाव
(ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २१०० रू प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन गणेश
माने देशमुख यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दास अनुसरून कारखान्याकडून बिल वेळेवर अदा करण्यात आले आहे.जयहिंद शुगरकडून नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात.यामध्ये जलसंधारणाची कामे,दुष्काळात अक्कलकोट-दक्षिण सोलापूर तालुक्यातील पशुपालकांना जनावरे सांभाळून दिलेला आधार असेल किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस बिले अदा करण्याचे काम जयहिंद शुगरने नेहमीच सामाजिक बांधिलकीतुन केली आहेत.

यावर्षीही दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस बिल अदा केल्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख,व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील,कार्यकारी संचालक मोहन पिसे,शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी सहकार्य करावे

दिलेल्या शब्दाप्रमाणे ३१ ऑक्टोबरपर्यंत पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा केले आहे.यंदाचा गाळप हंगाम यशस्वीपणे सुरू असून शेतकऱ्यांनी परिपक्व ऊसाचा पूरवठा कारखान्यास करावा.यातुन कारखान्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल – गणेश माने देशमुख,चेअरमन, जयहिंद शुगर

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!