मुंबई : राज्यातील विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकार आणि सरकामधील नेत्यांवर टिका करणारे भाजपचे आमदार नितिश राणे हे अडचणीत सापडले आहेत. यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानतंर शिवसेनेने आरोपींना अटक करण्याची मागणी लाऊन धरली होती, पोलिसांनी या प्रकरणी सचिन सातपुते याला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी नितेश राणे यांची दोनवेळा चौकशी केली. त्यानतंर तिसऱ्यांदा चौकशी साठी बोलावलं माञ नितेश राणे हे हजार झाले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन पाहिले मात्र ते घरी उपस्थित नव्हते, त्यामुळे पोलिसांनी विधान भावनासहित तीन जाग्यावर अटकेची फिल्डिंग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.