---Advertisement---

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अध्यक्षपदी प्रा. प्रकाश सुरवसे, सचिवपदी प्रा. धडके.

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अध्यक्षपदी सी. बी. खेडगी महाविद्यालयातील प्रा. प्रकाश सुरवसे, उपाध्यक्षपदी प्रा. शैला गिरी तर सचिवपदी प्रा. शिवाजी धडके यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या.  मावळते अध्यक्ष प्रा.शरणप्पा अचलेर व सचिव प्रा. निळाप्पा भरामशेट्टी यांचा कालावधी पूर्ण झाल्याने संघटनेची बैठक घेऊन या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रा. सिध्दाराम हालतोट यांची स्टाफ सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य तथा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रय फुलारी हे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा. वैदेही वैद्य, जेष्ठ सदस्य डॉ. शंकर धडके, प्रा. विजया कोन्हाली, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. महादेव येणपे, प्रा. वर्षाराणी हताली, प्रा. दीपा वलेकर, प्रा. रेणू इलगेर, प्रा. श्रीकांत जिडीमनी, व अन्य सदस्य उपस्थित होते. लवकरच तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची बैठक घेऊन आणखीन नव्या जबाबदाऱ्या देऊन संघटनेचे काम गतिमान करणार असल्याचे नूतन अध्यक्ष प्रा. सुरवसे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!