ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप नेतृत्वाने घेतली नारायण राणे यांना आलेल्या नोटिशीची दखल, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उतरले मैदानात

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राणेंनी या नोटिशीला कोणतेही उत्तर दिले नसले तरी यावरून वाद पेटला आहे. भाजप नेतृत्वाने राणेंना आलेल्या नोटिशीची दखल घेतली असून, खुद्द विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस काढणाऱ्या पोलिसांना अडचणीत आणले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद दरम्यान आमदार नितेश राणे मागील दोन दिवसांपासून गायब असून, ते कुठे आहेत या प्रश्नावर राणे यांनी वक्तव्य केले होते. नितेश राणे कुठे आहेत, हे मला माहिती असले तरी मी सांगणार नाही. असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंना त्यांचे पुत्र कुठे आहेत, हे माहिती असूनही ते सांगत नाहीत, त्यामुळे त्यांना काल दुपारी तीन वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती.

यावर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणबविस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणविस म्हंटले आहे कि, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते. सीआरपीसी 160 ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस ठाण्यात साक्षीसाठी बोलावता येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. असे न केल्यास भाजप सीआरपीसी 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा आयपीसी 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!