सोलापूर : इंग्रजी हे वैश्विक भाषा असून पत्रकारांनी ते आत्मसात करावी. इंग्रजी बोलण्यास शिकणे काळाची गरज बनली असून पत्रकारांनी जर ही भाषा शिकली तर त्याचा फायदा पत्रकार बांधवांना होणारच असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या पंधरा दिवसीय स्पोकन इंग्लिश वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्ह्णून बोलत होते.. याप्रसंगी संगमेश्वर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा अर्जुन धोत्रे, अनिल विपत, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, पत्रकार राजकुमार नरुटे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, उपाध्यक्ष सागर सुरवसे, प्रशिक्षक नागराज खराडे आदी उपस्थित होते.
चिटणीस म्हणाले की पत्रकारांना अनेक व्यक्तींना बोलावे लागते, कधी कधी परप्रांतीय आणि अमराठी अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावे लागते त्यावेळेस इंग्रजी बोलता येणे हे गरजेचे असते. त्यामुळे पत्रकारानी सुद्धा काही प्रश्न इंग्रजीमध्ये विचारले पाहिजेत. काही प्रश्नांची उत्तरे इंग्रजीमध्ये दिली पाहिजेत आणि ते या स्पोकन इंग्लिश वर्गामुळे ते शक्य होणार आहे..
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून स्पोकन इंग्लिश वर्गाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नागराज खराडे यांनी केले.