ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार ; जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांची माहिती

अक्कलकोट दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात आगामी होणारी जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले. शिव संवाद अभियान दोन अतंर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिली पदाधिकाऱ्यांची बैठक जिजाऊ जयंतीनिमित्त अक्कलकोट तालुक्यात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी जिजामाता, छत्रपती शिवाजीमहाराज, स्वामी विवेकानंद, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

पुढे बोलताना बरडे म्हणाले, आगामी होणा-या नगरपरिषद जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुक शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. त्यासाठी गाव तेथे शाखा, “वन बुथ टेन युथ” योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामास लागावे, व येणा-या निवडणुकीत शिवसेनेची ताकत दाखवावे. तालुकाप्रमुख सजंय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार यांचे काम चांगले असून युवकांची फौज त्यांनी निर्माण केली आहे. आता नगरपरिषद, जिल्हापरिषद व पंचायत समितीत भगवा फडकवा, असे ते म्हणाले.

तालुकाप्रमुख देशमुख व शहरप्रमुख पवार यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट नगरपरिषदेवर भगवा फडकावून दाखवणार, असे जिल्हाउपप्रमुख संतोष पाटील यांनी सांगितले. या निवडणुकीत निष्ठावंत व युवकाना संधी देणार, असे तालुकाप्रमुख देशमुख व शहरप्रमुख पवार यांनी सांगितले. यावेळी मल्लिनाथ खुबा यानी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख बरडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उदयोगपती महिबुब शेख, राहुल चव्हाण, मल्लिनाथ खुबा यांची शहर उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.

यावेळी संतोष घोडके, जेष्ठ नेते सोपान निकते, प्रा. सुर्यकांत कडबगावकर तालुका महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, शहर प्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुभांर तालुकाउपप्रमुख सैफन पटेल, प्रविण घाटगे, आनंद बुक्कानुरे, विभागप्रमुख उमेश पांढरे, सिध्दाराम ह्वरपेटी ,श्रीशैल स्वामी मृगेंद्र मुदिंनकेरी, उपविभाग प्रमुख उमाकांत साळंखे, गुरनिगंप्पा पाटील, समीर शेख, अनिल कोळी, संतोष पाटील, संतोष गद्दी, प्रसिद्धीप्रमुख बसवराज बिराजदार, शहर प्रसिद्धीप्रमुख खंडु कलाल, ग्राहक मंच प्रमुख सुरेश डिग्गे, शहरप्रमुख तेजस झुंजे, गणेश आळंगे, युवा सेना शहरप्रमुख विनोद मदने, तम्मा शेळके, शिवानंद कोळी, शहानवाज पटेल, विनोद प्याटी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!