मुंबई- महाराष्ट्रराचे महागायक व सोलापूर सूरमणी मोहम्मद अयाज याच्या संगीतातील प्रवासाची दखल घेऊन इंडिया बुक आँफ रेकार्ड २०२१ चा हा मानाचा पुरस्कार बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू आफिसर कल्ब येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास बिंदू दारासिंग, नवी मुंबईचे उपायुक्त डाॅ. जय जाधव, नवी मुंबई चे सहायक पोलिस आयुक्त सचिन सावंत, यशपाल शर्मा, शैलेद्र श्रीवास्तव, राजा चौधरी हे उपस्थित होते.
या वेळी मोहम्मद अयाज यांनी गाण्याच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचे आभार मानले. मोहम्मद अयाज यांना आतापर्यंत आशा भोसले, उषा मंगेशकर, अनुप जलौटा, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन , शान, हेमलता , साधना सरगम, वर्षा उसगांवकर, राम शंकर, सपना अवस्थी सारख्या अनेक दिग्गज कलावंतासोबत गाण्याची संधी मिळाली.
संगीत क्षेत्रातील दिग्गज मंगेशकर परिवाराची सतत साथ आणि आशीर्वाद मिळाले ही माझ्यासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे, अशी भावना मोहम्मद अयाज यांनी यावेळी व्यक्त केली.