---Advertisement---

महादेव जानकर कोरोनामुक्त होण्यासाठी रासपच्या पदाधिकाऱ्यांनी केला अभिषेक

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे चार दिवसापुर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ते बीड जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे जानकर यांनी सांगितले आहे. तरी राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका यांच्यावतीने जानकर साहेब हे कोरोनामुक्त होऊन पुन्हा एकदा बहुजन समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी त्याच जोशाने सुरुवात करण्यासाठी श्री बिरलिंगेश्वर व महालिंगराया यांनी त्यांच्या अंगी बळ, इच्छा, शक्ती देऊन त्यांना दिर्घायुष्य लाभो यासाठी अक्कलकोट शहर व तालुका यांच्यावतीने रासपचे तालुका अध्यक्ष सुरेश गुत्तेदार यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक घालून आरती व प्रार्थना केली.

यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय माडकर, शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अनिता घोडके, विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, तालुका कार्याध्यक्ष काशिनाथ निंबाळ, तालुका उपाध्यक्ष तिपण्णा घोडके, मैंदर्गी शहर अध्यक्ष सिध्दाराम तोरणी, महादेव बंदिछोडे, बिरु घोडके, बरगली बंदिछोडे, लक्ष्मीपुत्र कुंभार, प्रतीक पुजारी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!