शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
कोल्हापुर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. ते त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ व्यक्तीमत्त्व हरपले आहे.
काही दिवसांपासून त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या वयातही त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, या वेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.
एन.डी. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागाव, येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबाटुंबात झाला होता. त्यांनी अर्थशार्थशास्त्र याविषयात पुणे विद्यापीठातून १९५५ साली एम.ए. केले. तर १९६२ साली एल.एल.बी. केले. त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. त्यानंतर १९४८ साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लढाऊ आणि धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख झाली. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून त्यांची मोठी साहित्य संपदाही आहे.