अक्कलकोट, दि.२७ : हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांना एकत्रित येण्याची संधी आहे. यामुळे संघटनात्मक बांधणी पक्षाची चांगली होऊ शकेल, असे मत काँग्रेसच्या युवा नेत्या शीतलताई म्हेत्रे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुनिता हडलगी यांच्यावतीने अकलकोट काँग्रेस भवन हळदी -कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीताई म्हेत्रे ह्या होत्या. यावेळी बोलताना अध्यक्षा हडलगी म्हणाल्या की, महिला संघटीत होणे गरजेचे आहे. प्रत्येक कामात महिला हिरहिरीने भाग घ्यावा.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे माजी नगराध्यक्षा सुनंदा बकरे, नगरसेविका दिपमाला अडवितोट, सुरेखा पाटील, मंगल पाटील, वर्षा चव्हाण, वैशाली हावनूर, मनिषा खोबरे, राजश्री अळोळी, गीता कोंपा, सुकन्या ईचगे, विजयालक्ष्मी पवार, लक्ष्मी गौडगांव, श्रीदेवी गौडगांव, मेघा बिराजदार, गंगुबाई ईसापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास बसवराज अळोळी, महादेव चुंगी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .