ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाविन्यपूर्ण वेगळेपण धाडसी देशप्रेम – शिलेदार संस्थेच्या गिर्यारोहकांचा अनोखा उपक्रम

सोलापूर : प्रखर देशभक्ती असलेल्या ‘शिलेदार संस्थेच्या’ गिर्यारोहकांनी देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताकदिनी कळकराई सुळका आणि ढाक किल्ल्या यांच्या मधील दरीमध्ये ७३ फुट भारतीय तिरंगा ध्वज फडकावला आहे. सह्याद्रीच्या दाट जंगलात ढाक किल्ल्याजवळ असलेला कळकराई हा अतिशय दुर्गम व १८० फुटांपेक्षा अधीक उंचीचा हा सुळका कठीण आहे.

अशा या खडतर मोहिमेची आखणी शिलेदार गिर्यारोहण संस्थेने केली.प्रजासत्ताक दिनी कळकराई सुळका आणि ढाक किल्ला यांच्या मधील दरीमध्ये तिरंगा फडकावयचा असा दृढनिश्चय केला.शिलेदार संस्थेचे गिर्यारोहक सागर नलावडे,सागर गोरुले,प्रितम चौगुले,महेश तेरदाळे,अनिकेत जाधव,मोनिष येनपुरे, कविता बोटले, विनायक पुरी, प्रितेश गुडेकर,रजनीकांत जाधव, अमोल मुसळे या धाडशी मोहिमेत सहभागी झाले होते.

संस्थेचे अनुभवी गिर्यारोहकांनी मिळुन त्याठिकाणी ७३ व्या भारतीय प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत ७३ फुट तिरंगा दिमाखात फडकवला.एक वेगळी देशप्रेमाची ओळख यामुळे गिर्यारोहन क्षेत्रात झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!