आनंदाची बातमी ! ग्राहकांना मिळणार “इतका” दिवसांचा रिचार्ज व्हॅलिडीटी, ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना जारी केले “हा“ आदेश
दिल्ली : टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा फायदा होणार आहे. ट्रायने Telecom Tariff (66th Amendment) Order, २०२२ अंतर्गत घेतलेले नवीन निर्णय घेतले असून दूरसंचार कंपन्यांना आदेशही जारी केले आहेत. या आदेशानुसार आता टेलिकॉम कंपन्यांना २८ नाही तर ३० दिवसांची रिचार्ज व्हॅलिडीटी ग्राहकांना द्यावी लागणार आहे.
जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांची काही दिवसांपूर्वी प्रिपेड रिचार्जच्या किंमती वाढवल्या होत्या. प्रिपेड रिचार्जमध्ये तब्बल १५ ते २० टक्के वाढ करण्यात आली होती. यामुळे ग्राहकांनी प्रचंड नाराजगी व्यक्त केली होती. अशा स्थिथीत ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिलेल्या नव्या आदेशामुळे ग्राहकांना मोठा दि लासा मिळणार आहे. तसेच ग्राहकाला चालू प्लॅन पुन्हा रिचार्ज करायचा असेल तर तो सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून करू शकेल अशी तरतूद असावी अ सेही ट्रायने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.