---Advertisement---

खासदार सुनील तटकरे यांचे अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वागत;सहकुटुंब घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे अक्कलकोट शहरात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.तटकरे हे परिवारासोबत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी तालुक्याच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

श्री स्वामी समर्थांच्या असंख्य भाविकांप्रमाणे मी व माझे कुटुंबीयही स्वामींचे निस्सीम भक्त आहोत. आपण राजकीय क्षेत्रात वावरत असताना कोठेही असलो तरी स्वामींचे नित्य स्मरण चुकलेले नाही.परंतु ज्यावेळी निवांत वेळ मिळतो. त्यावेळी सहकुटुंब अक्कलकोटला येऊन स्वामी दर्शनाचा लाभ घेत असतो. त्यामुळे कुटुंबासमवेत स्वामी दर्शन होणे हे आमच्यासाठी अत्यंत सुखद बाब आहे,असे तटकरे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.मंदिर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला.भविष्यात भाविकांना विलोभनीय स्वामी दर्शनाचा व नयनरम्य वटवृक्ष मंदिर परिसराचा नेत्रसुखद लाभ घेता येणार आहे. त्याकरिता इंगळे यांच्या कार्यास स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा नेहमीच पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत पिसे, ओंकार माने,पंचू म्हेत्रे, स्वामीनाथ बेंद्रे, सुनील नंदीकोले, शिवराज स्वामी, रुद्रय्या स्वामी, यतीराज सिद्धे, बंटी पाटील, राजू चितळी, स्वामींनाथ चौगुले,श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे आदींसह तटकरे कुटुंबीयही उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!