अक्कलकोटमध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी,विधायक उपक्रम काळाची गरज : म्हेत्रे
अक्कलकोट,दि.२६ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती अक्कलकोटमध्ये मोरे वस्ती व ढाले वस्तीत अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.भीम क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल मोरे यांनी गरीबांना साडी वाटप व भोजन देऊन जयंती उत्सवावर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देत या उपक्रमाचे आयोजन केले होते. अशा या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते पाचशे महिलांना साड्या वाटप करण्यात आले.यावेळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, जेष्ठ नेते सिद्धार्थ गायकवाड, बसवराज आळोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.या उपक्रमात दोन हजार लोकांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती.मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत
हा विधायक उपक्रम राबवण्यात आला.असे उपक्रम यापुढे राबवू,असे मोरे यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदू ढाले, दिलीप शिंदे, देवीदास मोरे, नागनाथ मोरे, धनराज वाघमोडे, शिवलिंग पाटोळे, खाजाप्पा आयवळे, मिलिंद मोरे, खाजाप्पा वाघमारे, बाळू मोरे, अशोक मोरे, विकास मोरे, खाजाप्पा मोरे यांच्यासह भीम क्रांती तरुण मंडळ, मोरे वस्ती, ढाले वस्ती, हन्नुर चौक येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
महापुरुषांची जयंती विधायक
उपक्रमांनी साजरी करा
महापुरुषांचे विचार समाजाला दिशादर्शक आहेत.त्यांची जयंती अथवा पुण्यतिथी असे विधायक उपक्रम राबवून साजरी करावी. जेणेकरून समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना यातून दिलासा मिळू शकेल आणि खऱ्या अर्थाने त्यांना मदत केल्यासारखे होईल.
सिद्धाराम म्हेत्रे,माजी आमदार