अक्कलकोट, दि.१६ : वाराणसी येथे पट्टाभिषेक सोहळ्यासाठी गेलेल्या माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा काशीपीठाचे जगदगुरू श्री श्री श्री १००८ डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दुधनीचे म्हेत्रे परिवारातील सदस्य हे सतत धर्मकार्यात हिरीरीने सहभाग होतात,प्रत्येक सत्कर्मासाठी त्यांचा सढळ हाताने सहभाग असतो,असे गौरवोद्गार काशीपीठाच्या जगदगुरूंनी यावेळी काढले.दरम्यान सत्कारास उत्तर
देताना म्हणाले की, मनुष्याने आयुष्यात धर्मानुसार चालले पाहिजे.धर्मात गुरूंना लाखमोलाचे स्थान असून या भावनेतुन प्रत्येकाने जगले पाहिजे.आधुनिक युगात निती-धर्माचा विसर पडत चालला असून धर्मगुरूंच्या विचारधारेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.हीच विचारधारा जगाला तारणार असल्याचे विचार म्हेत्रे यांनी व्यक्त केले.यावेळी काशीपिठाचे उत्तराधिकारी डाॅ.मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी,उज्जैन पीठाचे जगदगुरू राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी,श्रीशैल पीठाचे डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी,खासदार जयसिध्देश्वर महास्वामीजी,मंद्रुपचे रेणूक शिवाचार्य,श्रीकंठ शिवाचार्य,जि.प.सदस्य मल्लिकार्जून पाटील,केदारनाथ उंबरजे,संजय इंगळे,शिवराज स्वामी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.