अक्कलकोट, दि. १२ – तालुक्यातील सलगर येथे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री जय हनुमान कारुणी यात्रा- महोत्सव निमित्त मंगळवार पासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंगळवारी ( दि.१४) व्हन्नुगीनिमित्त पहाटे श्री हनुमान मुर्तीस महारुद्राभिषेक, सकाळी कळसारोहण, दुपारी पालखी उत्सव, नंदीध्वज, कुंभ, मिरवणूक दोरसहीत पालखी व रथोत्सव कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजेपर्यंत भव्य मिरवणूक परमपूज्य श्री रेवणसिध्देश्वर स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात शोभेचे दारुकाम व रथोत्सव कार्यक्रम संपन्न होईल. रात्रौ १० वाजता जय हनुमान पारिजात भजना मंडळ व श्री महादेव भजना मंडळाचा भजन कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी ( दि.१५ ) कारुणी यात्रा महोत्सव पहाटे ३ ते सकाळी ७ पर्यंत दंडवत व सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत बैलांचे सवाद्य मिरवणूक त्यानंतर मंदिर परिसरात दुपारी १२ ते सायंकाळी ५.३० पर्यंत कारुणी बैल गाड्यांचे पळविण्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता श्री जय हनुमान नवतरुण कन्नड सामाजिक नाटका ( मगा तंद मांगल्या अर्थात छल सादिसीद चतुर ) चा प्रयोग होणार आहे.
गुरुवारी ( दि. १६ ) दिवसभर श्री अक्कमहोदवी भजना मंडळा साकीन महल ( ऐनापूर ) विजयपूर मुख्य गायक भारतरत्न पुरस्कार विजेती श्रीमती शोभा व श्री यल्लालिंगेश्वर भजन मंडळ कडणी ( ता. सिंदगी जि.विजयपूर) चे मुख्य गायक धानम्मा तळवार यांचे भजन कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी ( दि. १७ ) राञी ” मगा तंद मांगल्या अर्थात छल सादिसीद चतुर सामाजिक कन्नड नाटकाचा दुसरा प्रयोग होणार आहे.
परगावहून आलेल्या भक्तगणांना पिण्याच्या पाण्याची व महाप्रसादची सोय केलेली आहे. तरी सर्व सदभक्तांनी सहभागी होऊन यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान कारुणी यात्रा पंचकमिटीनी केले आहे.
भारतीय
संस्कृतीचे दर्शन
तालुक्यातील सलगर येथे जय हनुमान कारहुणवी याञेला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामध्ये महाराष्ट्रसह कर्नाटकातील हजारो भाविक सहभागी होतात. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिक व महिला वर्ग मोठी गर्दी करतात. विशेषतः सर्व जाती धर्मातील भाविक सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितात.
सुनिल पाटील, सामाजिक
कार्यकर्ता सलगर