---Advertisement---

सह्ययक पोलीस आयुक्त गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१२ : सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड वाढदिवसानिमित्त चपळगाव (ता. अक्कलकोट ) येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.उद्योजक तथा सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त झाडे लावा, झाडे जगवा या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून नागरिकांना पर्यावरण प्रेमाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमातून गरीब विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्य दिले असून त्याला यातून गरीब विद्यार्थ्यांना नक्की दिलासा मिळेल तसेच वृक्षारोपण यासारख्या उपक्रमातून पर्यावरण वाचवण्याचा संदेश ग्रामस्थांना मिळेल,असे सरपंच पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ,तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील, अंदाप्पा बंडगर, सुरेश सुरवसे, जयभिम गजधाने,विनोद गजधाने, अमोल गजधाने, निलेश गजधाने, अंगुली गजधाने, खाजप्पा गजधाने,कमलाकर जैनजंगडे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण गजधाने, परमेश्वर वाले, प्रदीप वाले, विलास कांबळे तम्मा गजधाने आदींसह ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!