जिल्हा परिषद गट व गण प्रारूप आराखड्यावरील हरकती;अक्कलकोट तालुक्याच्या चौदा हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणा बाबतीत अंतिम प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला असून आज विभागीय आयुक्तांनी हरकतींवर अंतिम निर्णय दिला आहे.
यात तीन हरकती अंशतः मान्य केल्या तर एक पूर्णपणे मान्य केली आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली आहे.३१ मे रोजी तालुक्यातील
गट व गण याबाबतीत प्रारूप आराखडा
प्रसिद्ध झाला होता.त्यावर प्रशासनाने हरकती मागवल्या होत्या.यात अठरा प्रकारच्या हरकती या तालुक्यातून दाखल झाल्या होत्या.यावर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली.यात चौदा हरकती ह्या फेटाळून लावल्या आहेत.यात पालापुर हे अंतिम प्रारूपच्या पूर्वी वागदरी गणात होते आणि शिरवळवाडी हे शिरवळ गणात होते.ही हरकत मान्य करून पालापूर शिरवळ गणाला जोडण्यात आले आहे तर शिरवळवाडी वागदरी गणाला जोडले आहे.दोड्याळ पूर्वी जेऊर गणात होते.आता ते दहिटणे गणाला जोडले आहे.गुरववाडी हे तोळणुर गणात होते.आता कडबगाव गणाला जोडले आहे.मराठवाडी हे कडबगाव गणात होते तर आता तोळणूर गणाला जोडले आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी एक गट आणि दोन गण नव्याने अस्तित्वात आले असून आता तालुक्यात सात गट आणि चौदा गण निर्माण झाले आहेत.त्यामुळे तीन जागेवर नव्या शिलेदारांना संधी मिळणार आहे.या निकालाने अनेकांना हादरा दिला असून फक्त चार ठिकाणच्या हरकतींना प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे तर अन्य चौदा ठिकाणची हरकतीना फेटाळत प्रारुप आराखडा योग्य असल्याचा निर्वाळा
विभागीय आयुक्तांनी दिला आहे.
आता सात गट
आणि चौदा गण
पूर्वी तालुक्यात सहा गट आणि बारा पंचायत समिती गण कार्यरत होते.आता तालुक्यात तोळणूर एका नव्या जिल्हा परिषद गटाची तर तोळणूर आणि सिन्नूर दोन पंचायत समिती गणांची भर पडली आहे.यामुळे तालुक्यात एक जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत.