---Advertisement---

शिवपुरी येथे १ ते ३ जुलै दरम्यान आयुर्वेदिय रोग निदान शिबिर

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोटपासून जवळच असलेल्या विश्व वेलनेस सेंटर शिवपुरी येथे दि.१ ते ३ जुलै दरम्यान आयुर्वेदीय रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.गिरीजा राजीमवाले यांनी दिली आहे.या शिबिरात आमवात, त्वचा विकार, संधिवात,पित्ताचे विकार, पचनाचे विकार, सांध्याचे विकार, लहान मुलांचे विकार, वारंवार होणारी सर्दी ,खोकला व कृमी या आजारांची शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी व निदान होणार आहे.सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी रुग्णांनी आपल्या नावाची नोंदणी ८९५६११५७११,७४४७४८९११५ या क्रमांकावर करावी.अक्कलकोटपासून जवळच असलेल्या शिवपुरी येथे हे शिबिर होणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन विश्व वेलनेस सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!