---Advertisement---

”या” बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शिंदे – फडणवीस सरकारने घेतला निर्णय

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे.

भू विकास बँकेच्या मालमत्तां शासनाकडे हस्तांतर करणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. आज कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिपावलीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी आपण चांगला निर्णय घेतला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसंच कालपर्यंत जी अतिवृष्टी झाली त्यात जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करून आमच्याकडे पाठवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना आत्तापर्यंत आपण सात हजार कोटींची मदत केली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हे सरकार उभं आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!