ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अहो आश्चर्यम ! स्वातंत्र्यानंतर प्रथमच घुंगरेगावात गावात लालपरी धावली !

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२७ : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रयत्नामुळे अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगावात अखेर बस पोचली. दिवाळीची गोड भेट गावकऱ्यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच खासदारांच्या पाठपुराव्यामुळे लालपरी धावल्यामुळे गावात एकच चर्चा सुरू आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवाळीची धाम धूम सुरू होती. अशा जल्लोषपूर्ण वातावरणात अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगावातील ग्रामस्थांसाठी ही दिवाळी आगळीवेगळी ठरली आहे. कारण खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे घुंगरेगावात एसटीची सेवा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रथमच या गावात लालपरी धावताना दिसल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असून त्यांनी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजींचे आभार मानले आहेत. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या हस्ते एसटी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अक्कलकोटचे आगार प्रमुख रमेश मंथा, शाखा उपअभियंता आर. डी गायकवाड, रुद्रमुनी हिरेमठ, योगेश गवळी, अमर पाटील, शिवपाद किणगे, सरपंच श्रीशैल माने, श्रीकांत पवार, संतोष गुरव, तात्या पवार, राजू पाटील, मल्लिकार्जुन तामदंडी, समर्थ नागशेट्टी, नामदेव पवार,सिध्दप्पा पुजारी, मल्लिकार्जुन गुरव, विठ्ठल बिराजदार, शांतप्पा बनसोडे, परशुराम सुतार, भरत पवार, चालक, वाहक, आजी माजी सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी ग्रामस्थांनी प्रथमच गावात बस आल्याने वाजत गाजत त्याचे स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!