शेतकऱ्यांच्या हितासाठीच जयहिंद शुगरची क्षमता वाढवली : खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामीजी, आठव्या गळीत हंगामास प्रारंभ
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट : इथेनाॅल प्रकल्प, सहवीज निर्मीती असल्याने साखर कारखानदारीत जयहिंद शुगरने नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यातच भर म्हणून कारखान्याने गाळपाची क्षमता वाढविल्याने शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठीच जयहिंद शुगरने विस्तार केल्याचे प्रतिपादन खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी केले.
आचेगाव (ता.दक्षिण सोलापुर) येथील जयहिंद शुगरच्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन गणेश माने देशमुख, उस्मानाबाद भाजपचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, बाळासाहेब माने देशमुख, मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख, शालिवहन माने देशमुख, सरपंच रमेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बसवराज पाटील व मोहन पाटील या शेतकरी दांपत्याच्या हस्ते मोळीपुजन संपन्न झाले.
पुढे बोलताना महास्वामीजी म्हणाले की, आपला देश कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जयहिंद परिवाराची वाटचाल सुरू आहे. शेतकर्याचाआर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी जयहिंदने हातभार लावल्याचे त्यांनी नमुद केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. देशमुख, शेतकी अधिकारी चंद्रशेखर जेऊरे, सिध्देश्वर उमरदंड, अमोल जगताप, श्री अवताडे, श्रीकांत झोरी, सिध्देश्वर पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदोपचार तिर्थ येथील वेदमुर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी केले.सुत्रसंचालन दत्तात्रय तोरणे यांनी तर आभार एम.आर.हत्तुरे यांनी मानले.
शेतकऱ्यांचे सहकार्य मोलाचे
जयहिंद शुगरच्या वाटचालीत शेतकऱ्यांचा सहभाग मोलाचा ठरला आहे. यंदाच्या हंगामाता १५ लाख ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. अतिरिक्त पावसाने हंगाम लांबला असला तरी हंगामाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी-कर्मचारी- कष्ट घेत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करून कारखान्याची वाटचाल सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे-गणेश माने देशमुख, चेअरमन