---Advertisement---

ब्रेकिंग..! अक्कलकोट तालुका शिवसेनेला लागलेली गळती थांबेना.. आणखी पंधरा जणांनी दिला राजीनामा..

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचा नावच घेत नाहीये. काल दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार रोजी तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर आज उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी पंधरा पदाधिकारी राजीनामा देत आहोत, असे तालुकाउपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांनी सांगितले आहे.

आज तालुकाउपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांच्यासोबत तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षाताई चव्हाण, शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनुर, उपप्रमुख ताराबाई कुभांर, युवासेना शहरप्रमुख विनोद मदने, शहर उपप्रमुख महिबुब शेख, उपप्रमुख तेजस झुंजे विभागप्रमुख उमेश पांढरे, तानाजी मोरे उपविभाग प्रमुख समीर शेख, बसवराज कोळी, शिक्षकसेना तालुकाप्रमुख प्रा.इरण्णा धानशट्टी, व्यापारी सेना तालुकाप्रमुख मल्लिनाथ पाटील यानी आपला पदाची व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सपंर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्ह्याप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे पाठवले आहेत.

यावेळी बोलताना सुर्यकांत कडबगावकर म्हणाले की, गेली अनेक वर्ष आम्ही शिवसेनेच काम करीत आहोत. कधी सत्तेत असताना तर कधी विरोधात असताना प्रत्येक वेळी पक्ष कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले त्यात यश ही आले. हिंदुत्व आम्ही कधी सोडलो नाही. परंतु कार्यकर्त्याना बळ द्या, असे वरिष्ठना अनेकवेळा सागंतलो पण त्यानी इकडे लक्ष दिले नाही. अडीच वर्षात सत्ता होती तरीही कामे झाली नाही. शासकीय कमीट्यांची नेमणूक नाही, शिवभोजन थाळी आमच्या कार्यकर्त्याना न देता कांग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्याना दिले. कोणतेही विकासाचे कामे झाली नाहीत, जेष्ठतेनुसार पद न देता त्यांना मानसिक त्रास देण्यात आले. हे वरीष्ठाना कळवुन सुध्दा उपयोग झाले नाही, त्यामुळे आम्ही तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वा पक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असे कडबागवकर यानी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!