ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा कायम, आतापर्यंत ११ दोषींना झाली शिक्षा

दिल्ली : २००० साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने त्याची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. २२ डिसेंबर २००० रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह अन्य तीनजण ठार झाले होते.

या दरम्यान लष्कराने केलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. या प्रकरणी अशफाकला ३१ ऑक्टो बर २००५ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत १० ऑगस्ट २०११ रोजी दहशतवादी आरिफला फाशीची शिक्षा सुनावली.

लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत ११ दोषींना शिक्षा झाली आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपी आरिफ याने २००५ पासून आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी अनेक वेळा पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळी त्यांची याचिका फेटाळून लावली.

या पूर्वी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची पुनर्विचार याचिका फेटाळताना आरिफची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्याचवेळी २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने आरिफची उपाय सुचवण्यासाठी केलेली याचिकाही फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!