ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तोळणुर येथील शेतकऱ्याची माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली भेट

सचिन पवार

अक्कलकोट,दि.१३ अक्कलकोट तालुक्यातील तोळणुर येथे दि.१२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणाने सोगुर या शेतकऱ्याच्या ऊसाला अचानक पेट घेतल्याने लगेचच तेथील उपस्थित युवकांनी ग्रामस्थांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यानां फोन करून सदरील घटनेची माहिती कळवली. त्यानंतर प्रथमेश म्हेत्रे यांनी याची गांभीर्यता ओळखुन अक्कलकोट येथील अग्निशामक मंडळांच्या विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आणि अग्निशामक दलाचे सर्व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण आणले. पण शेतकऱ्याचे होणारे लाखो रुपयाचे नुकसान सभापती म्हेत्रे यांच्यामुळे टळले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

अक्कलकोट तालुक्यामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेल आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचण मध्ये सापडला आहे.त्यात पुन्हा ही घटना घडली.जर वेळीच कोण सावध झाले नसते तर शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका पुन्हा एकदा सहन करावा लागला असता.वेळीच याची सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी गांभीर्याने दखल घेऊन अग्निशामक दलाशी संपर्क साधून हालचालींना वेग आणला. आणि शेतकऱ्यावरील मोठा अनर्थ टळला. त्यामूळे आज पुन्हा तोळणुर येथील ऊस जळालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोगुर यांच्या शेतीची माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाहणी केली.

जळीतग्रस्त उसाची पाहणी करून सदरील शेतकऱ्यास धीर देत प्रशासनाकडून काही मदत मिळु शकते यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा धीर म्हेत्रे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला. यावेळी तोळणुर येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!