---Advertisement---

मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय – आमदार जितेंद्र आव्हाड

Follow Us:
---Advertisement---

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असं ट्विट केलं आहे. पोलिसांनी ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, पोलिसांनी माझ्याविरोधात ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तेसुद्धा ३५४. या पोलिसी अत्याचाराविरुद्ध मी लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हर हर महादेव चित्रपटाच्या निषेधार्थ विवियाना मॉलमध्ये राडा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. त्यानंतर दोनच दिवसात जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.

एका महिलेनं जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आठवड्याभरात हा दुसरा गुन्हा आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात भादंवि कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!