ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राहुल गांधी यांच्याबरोबर चालल्या अक्कलकोटच्या शितल आणि लक्ष्मी म्हेत्रे ! म्हेत्रे घराण्यातील युवा पिढीमुळे तालुक्यात काँग्रेसला नवी उमेद

सचिन पवार

कुरनूर:  सोलापुरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अकोला या जिल्ह्यातील पातुर या गावी भारत जोडो यात्रेचे स्वागत केले या यात्रेत अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या शितल म्हेत्रे व लक्ष्मी म्हेत्रे राहुल गांधी यांच्याबरोबर चालताना दिसत आहेत.खर तर सध्या प्रथमेश म्हेत्रे व शितल म्हेत्रे राजकारणामध्ये त्यांची इंट्री झाली असून लक्ष्मी म्हेत्रे सुद्धा राजकारणात येणार का अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. कारण तेही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे.

एकीकडे काँग्रेसला खिंडार पडत असताना दुसरीकडे मात्र अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे घराण्यातील या युवकांची राजकारणामध्ये एन्ट्री झाल्याने काँग्रेससाठी तालुक्यात अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. कारण मागच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पराभव सहन करावा लागला त्यानंतर तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे भाजपचा पराभव करून आमदार होऊन गृहराज्यमंत्री झाले. त्यांच्या रूपाने तालुक्यात अनेक विकास कामे झाले. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करण्याची चर्चा सुरू होती आणि ते भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. परंतु तसे काही घडले नाही. यानंतर त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोर जावे लागले.

यामुळे काँग्रेस पक्ष तालुक्यातील डगमगीला आला अशी चर्चा होते परंतु असा असताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या शितल म्हेत्रे व अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे सुपुत्र प्रथमेश म्हेत्रे या दोन तरुण युवकांची राजकारणामध्ये एन्ट्री झाल्याने ते जोमाने कामाला लागले आहेत. आता लक्ष्मी म्हेत्रे हे सुद्धा राजकारणामध्ये येणार का ते पाहावं लागणार आहे. ते सध्या युवकांचे ते प्रेरणास्थान ठरत आहेत. कारण माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे त्यांच्याबरोबर येते आज काँग्रेस पक्षासाठी काम करताना दिसत आहेत.म्हेत्रे घराण्यातील या दोन युवकांनी अनेक कार्यक्रमाला हजेरी लावणे, तरुणांना एकत्र करणे, अनेक राजकीय सांस्कृतिक क्रीडा अशा सर्वच कार्यक्रमाला उपस्थित राहून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ग्रामीण भागातील लोकांची समस्या सोडवणे त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील तालुक्यात तितकीच वाढलेली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचा मोठा फायदा या दोन युवकांच्या रूपाने काँग्रेसला होऊ शकतो. प्रथमेश म्हेत्रे हे सध्या दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असून ते दुधनी नगराध्यक्ष पदाचे दावेदार मानले जात आहेत.तर युवा नेत्या शितल म्हेत्रे तोळनूर जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहेत.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!