ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिंदखेड पुरग्रस्त शेतकरी कुटुंबांना सारथीकडून दिवाळी फराळ

 

दक्षिण सोलापूर दि.२२ : आॅक्टोंबर महिन्यात पावसामुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात पाणी शिरले. ज्यामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. शेतकरी व कामगार कुटुंबांना याची झळ अधिक बसली. दिवाळी सण आला परंतु झालेल्या नुकसानीमुळे दिवाळी गोड कशी लागेल. अशा या पुरग्रस्त शेतकरी व कामगार कुटुंबांना फराळ पाकिटांचे वाटप सारथी युथ फौंडेशनच्या वतीने करण्यात आले.
सारथी युथ फौंडेशन मागील १३ वर्षापासून समाजातील गरजू कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा करत असते. याहीवर्षी अखंडपणे हा सण सारथीने गरजू कुटुंबासोबत साजरा केला.

दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. आजही समाजात अनेक कुटुंब आहेत जी अडचणींमुळे दिवाळी सण साजरा करू शकत नाहीत. अशा कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा करून सारथी सामाजिक बांधिलकी जपत आहे.

यावर्षी निर्माण झालेल्या कोरोनाजन्य परिस्थिमुळे सुरक्षेच्यादृष्टीने नियम पाळत, फराळ पाकिटे तयार करून वाटप करण्यात आले.
फराळ वाटप करण्यासाठी सारथी युथ फौंडेशनचे अॅड. जावेद नगारे, रामचंद्र वाघमारे, तुकाराम चाबुकस्वार, मंजुनाथ फुलारी, राजेश शेखर सानक सिंदखेड गावाचे माझी सरपंच रविंद्र इंगळे ,सोसायटी चेअरमन बसवराज गवसने, राजशेखर भुसारे, फेरोज पटेल, काशीराया हविनाळे, अंकुश गावडे, सातप्पा माने …. आदिनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!