हे चालणं हे एक प्रतिकात्मक, आजपर्यंत ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ – उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबईमध्ये निघालेल्या हल्लाबोल मोर्चामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. ते काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या मोर्चासाठी जमलेल्या महाराष्ट्र प्रेमींना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण खालीलप्रमाणे आहे.
बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. घोषणा केल्यानंतर मला विचारलं की तुम्ही इतके चालणार का.. मी म्हटलं मी एकटा नाही तर माझ्यासह लाखो महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. हे चालणं हे एक प्रतिकात्मक आहे. आजपर्यंत ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे.
संयुक्त महाराष्ट्रानंतर असं दृश्य संपूर्ण देशाने पहिल्यांदा पाहिलं असेल. 60-62 वर्षां पूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. त्याही वेळेला प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यावेळेलाही लढायासाठी होता तो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्र झाला मात्र तो बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही, तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे सांगण्यासाठी हा मोर्चा आहे. कोणीही येत आणि दिवाचून जायच?
आज सर्वपक्ष एकवटलेत फक्त महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाहीत. काही जण स्वत:ला हिंदू हृदूदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाणारे तोतये म्हणवतात. बाळासाहेबांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेलीतरी बेहत्तर पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता याच्याशी तडजोड करणार नाही, जो ते करण्याचा प्रयत्न करेल त्याला गुडघ्यावर झुकवल्या शिवाय राहणार नाही, हा बाळा साहेबांचा बाणा होता.
राज्यपाल पदावर कोणीही बसावं आणि कोणालाही टपल्या मारावं हे आम्ही सहन करणार नाही. राज्यपाल कोण असावा? केवळ केंद्रात जो बसतो त्यांच्याकडे काम करणारा माणूस केवळ सोय म्हणून कुठेतरी पाठवून द्यायचं असं चालत. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात आणि त्यांनी त्यांच्यासारखे वागले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतायत, महात्मा फुले, सावित्रबाई फुलेंबद्दल बोलतायत. जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले नसते तर आपण आज कुठे असतो त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी ‘भीक’ शब्द वापरून दाखवून दिलंय. फुले दाम्पत्याने शेणमार सहन करून माझ्या लोकांना मी शिकवणारच हे ध्येय डोळ्या समोर ठेवलं होतं. आपण जर शाळेत गेलो नसतो तर आपणही असे मंत्री बनून अशी शाब्दीक भीक मागत बसलो असतो. हे वैचारीक दारीद्र्य आहे. एकीकडे अशे बौद्धीक दारीद्र्य असलेले मंत्री आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंना वेडंवाकडं बोलणारे मंत्री आहेत. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणार. त्यांचे नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाही. हे लफंगे असून महाराष्ट्र लुटायला आले आहेत. छत्रपतींनी परस्त्री बद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण आम्हाला दिली आहे.
तिसरे मंत्री आपले मुंबईचे पालकमंत्री, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची तुलना या खोकेवाल्यां बरोबर केली. कुठे तुम्ही कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास… आग्र्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि यांनी खोके घेऊन, लांडी लबाडी करून, तोतयेगिरी करून, पाठीत वार करून सरकार स्थापन केलं त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करता? या गर्दीने महाराष्ट्र द्वेष्ट्यांचे डोळे उघडले पाहिजेत, जर ते उघडणार नसतील तर ते कधीच उघडू नयेत अशी आपण शिवचरणी प्रार्थना करूया.
मुंबई महाराष्ट्र ही आम्ही मातृभूमि मानतो, मात्र मुंबईचे पालकमंत्री मुंबईचा हिसब स्क्वेअर फुटामध्ये करतात. मुंबई स्क्वेअर फुटत विकानेची जागा नाही, ती आमची मायमुळी आहे. तिच्याबाबरोबर खेळण्याचा प्रेतं केलात तर आगडोंब पेटेल.
एका बाजूला महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवून टाकायची, आदर्श पायदळी तुडवायचे त्यांचा अपमान करायचा, महाराष्ट्रात येणारे उद्योग धंदे दुसऱ्या राज्यात पळऊन न्यायचे. गाव कुरतडायला लागायची, म्हणजे महाराष्ट्र चहूबाजूने संपून जाईल, भिकेला लागेल हा यांचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्र द्रोह्यांच राजकारणात शेवट केल्याशिवाय स्वस्त बसता येणार नाही. यांचा मोर्चा ही सुरुवात आहे