---Advertisement---

शिरवळमध्ये विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याची भरपाईची मागणी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाल्याची घटना घडली आहे. सुरेश उर्फ सुरेशचंद्र सुरवसे ( सूर्यवंशी ) असे शेती असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची गट नं ८७ ही सहा एकर जमीन शिरवळ येथे आहे.

दुपारी अचानकपणे डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या शेतकरी तसेच गावातील काही तरुणांनी शेताकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

केवळ महावितरणच्या गलथनपणामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले असून असे प्रकार वारंवार गावोगावी होत आहेत.त्याला जबाबदार महावितरण असल्याचा आरोप शेतकरी सुरेश सुरवसे यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!