ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणणार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात महत्वाची दिली आहे. या कार्यक्रमात बोलताना लवकरच ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. तसेच, २०२५ च्या अखेरपर्यंत रस्ते अपघात पन्नास टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असे गडकरींनी सांगतिले.

यासोबतच “ट्रक चालकांसाठी कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. या वर्षी मंत्रालयाने ‘सर्वांसाठी सुरक्षित रस्ते’ या उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छता पंधरवड्यातंर्गत ११ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला. रस्ते अपघात २०२५ च्या अखेरपर्यंत पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!