---Advertisement---

छोटा राजनचे भाऊ दिपक निकाळजे यांची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : गँगस्टर छोटा राजनच्या भावाची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेंबूर येथे काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची एक परिषद पार पडली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे यांची निवड करण्यात आली.

यावर दीपक निकाळजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, आमचा पक्ष 1990पासून आहे. पण पक्षाची वाढ झाली नाही. त्याची कारणं आम्ही शोधली आहेत. त्यामुळे पक्ष वाढीसाठी आम्ही काम करणार आहोत. आम्हाला कुणी युती किंवा आघाडीची ऑफर दिली तर आम्ही आमच्या पक्षाचं हित पाहूनच पुढील निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. आमची ताकद विखुरल्या गेली होती. ती एकत्र करण्याचं आमचं ध्येय आहे. आमच्या पक्षाचे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. असे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!