‘’त्या’’ एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या… याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात
पुणे : दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या ४ चुलत भावानींच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.
आरोपीच्या मुलाचा अपघात करून मुलाचा खून केल्याच्या संशयातून सात जणांची हत्या करून आरोपींनी भीमा नदीत मृतदेह फेकल्याचे समोर आले आहे. ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत. अंधश्रद्धेतून हे हत्यांकड घडल्याचं म्हटलं जात आहे. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन मुले यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते.
मोहन आणि त्यांचे कुटुंबीय १७ जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला.